लॉज मध्ये नक्की चाललंय काय?बारामती शहर व परिसरात पोलिसांकडून लॉज चेकिंग दरम्यान कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 27, 2023

लॉज मध्ये नक्की चाललंय काय?बारामती शहर व परिसरात पोलिसांकडून लॉज चेकिंग दरम्यान कारवाई..

लॉज मध्ये नक्की चाललंय काय?बारामती शहर व परिसरात पोलिसांकडून लॉज चेकिंग दरम्यान कारवाई..
बारामती:-बारामती शहर व परिसरामध्ये जोडप्यांना खोल्या काही तासासाठी भाड्याने दिल्या जातात. या कपलमध्ये बऱ्याच महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांचा सुद्धा समावेश आहे या प्रकारच्या तक्रारी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी स्वतः व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक शहर पोलीस, ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे तसेच बारामती शहरकडील महिला व पुरुषांच्या स्टाफ च्या मदतीने बारामती शहरातील स्वागत लॉज, महालक्ष्मी लॉज, गंगासागर लॉज, कॅप्टन लॉज या सर्व लॉजिस भर दुपारी चेक केल्या त्यामध्ये कुणी मिळून आले नाही परंतु सदर रजिस्टर मध्ये जुन्या नोंदी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर यशवंत लॉज या ठिकाणी सहा खोल्यांमध्ये काही महिला व तरुण हे मिळून आले त्यांच्या नातेसंबंधाबाबत त्यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही त्या लोकांना पोलीस ठाण्यात आणून अश्लील चाळे करण्यासाठी ते लॉज मध्ये आले होते लॉज सार्वजनिक जागा आहे त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 117 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून एकूण सहा 110 117 कारवाई व एक ते 30 डब्ल्यू 131 प्रमाणे कारवाई करण्यात आली .माननीय न्यायालयात सदर बाबत खटला पाठवण्यात येईल. तसेच यशवंत लॉजवर त्यांना परवानाच्या नियमाची भंग केला म्हणून म्हणून महाराष्ट्र पोलीस कायदा30 डब्ल्यू 131 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.परिसरातील सर्व लॉज चालकांची बैठक पोलीस ठाण्यात बोलून या प्रकारे अनधिकृत पणे महाविद्यालयातील युवक व युवती यांना खोल्या भाड्याने दिल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करून परवाना रद्द साठी सादर करण्यात येणार आहे.
लॉजवर येणाऱ्या जोडप्याने सुद्धा आपली बदनामी टाळायची असेल तर अशा पद्धतीने लॉजवर जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले.भविष्यामध्ये विवाहबाह्य किंवा विवाहपूर्वी शारीरिक संबंध आल्या बाबत तक्रारी दाखल होतात. त्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन गुंगीकारक औषध देऊन तसेच इतर आश्वासने देऊन शरीर संबंध ठेवले जातात असा उल्लेख असतो. आणि त्यावेळेस महिलेकडून लॉज चे नाव सांगितले जाते याप्रकारे यापुढे ज्या लॉज चे  नाव येईल त्या लॉज चालक हा सदर गंभीर केस मध्ये सहा आरोपी म्हणून घेण्यात येईल. स्वयराचार थांबवायचा असेल तर पोलिसांबरोबरच व्यावसायिकांनी सुद्धा सहकार्य करणे अपेक्षित आहे.नैतिकता म्हणून सामाजिक कर्तव्य म्हणून लॉज चालकांनी महाविद्यालयीन तरुण-तरुणी तसेच अनैतिक संबंध असणाऱ्यांना लॉज देऊ नयेत.अचानक झालेल्या लॉज वरील कारवाईमुळे बारामती मध्ये तर्क वितर्क काढू लागल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले.

No comments:

Post a Comment