*बारामतीच्या विद्यार्थ्यांचे कराटे परीक्षेत यश* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 16, 2023

*बारामतीच्या विद्यार्थ्यांचे कराटे परीक्षेत यश*

*बारामतीच्या विद्यार्थ्यांचे कराटे परीक्षेत यश*
बारामती:- रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी वर्ल्ड शोतोकान कराटे आणि स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने राधा कृष्ण मंगल कार्यालय  येथे आयोजित कराटे बेल्ट परीक्षेमध्ये *'चॅम्पियन्स स्पोर्ट्स फौंडेशनच्या'* खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. ह्या कराटे परीक्षेत मध्ये एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.  यांचे प्रशिक्षण सेन्सेई अनुराग देशमुख (अध्यक्ष चॅम्पियन्स स्पोर्ट्स फौंडेशन व WSKSA चे सचिव) व सेन्सेई शेखर गोसावी ( चॅम्पियन्स स्पोर्ट्स फौंडेशन प्रशिक्षक) यांनी केले. सेन्सेई तेजस कांबळे (अध्यक्ष WSKSA) यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. ह्या बेल्ट वितरण समारंभाला डॉ. विशाल बाबर सर (मुख्य प्रशासकीय अधिकारी दत्तकला शिक्षण संस्था,दौंड.) , अजय गायकवाड सर(राधा कृष्णमंगल कार्यालय) , कल्पना भोरकर व सविता कदम मॅडम(पालक) हे प्रमुख मान्यवर म्हणून लाभले. सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे , पालकांचे व मान्यवरांचे आभार अनुराग सरांनी  मानले व त्यांनी मुलांना व पालकांना संबोधित केले की या धावपळीच्या काळात मुलांना व्यायामाची खूप गरज आहे व आता चाललेल्या परिस्थितीमध्ये मुलांना रोगप्रतिकारशक्ती मध्ये वाढ करण्याची गरज आहे त्यासाठी मुलांनी कोणत्याही खेळांमध्ये भाग घेणे गरजेचे आहे.*परीक्षेमधील पदक विजेते खेळाडू खालील प्रमाणे*. *गोल्ड मेडल :*   रुद्र माने, शिवम काटे , रक्षा बाबर, अक्षदा काशीद, शरयू चव्हाण. *सिल्वर मेडल :* अद्वैत मुळे , धनुष पाटील, हिंदवी थोरात, पार्थ भोरकर ,श्रेया मिंड , संस्कृती जाधव, राजवर्धन निंबाळकर, सिद्धी महामुनी,रुद्र बर्गे.

No comments:

Post a Comment