बारामती शहर पोलिसांकडून एक गावठी पिस्तल व तीन जिवंत काडतूस जप्त... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 26, 2023

बारामती शहर पोलिसांकडून एक गावठी पिस्तल व तीन जिवंत काडतूस जप्त...

बारामती शहर पोलिसांकडून एक गावठी पिस्तल व तीन जिवंत काडतूस  जप्त...
बारामती:- पुणे ग्रामीण हा औद्योगीकरण झालेला जिल्हा आहे या ठिकाणी या ठिकाणी वर्चस्वासाठी धमकवण्यासाठी तसेच इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट साठी अवैध अग्नीशास्त्राचा वापर होत असतो  पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी या प्रकारे अग्नीशास्त्रांचा कायम शोध घेण्याबाबत दर दिवशी दर आठवड्याला ते आढावा घेत असतात. त्या प्रकारची आदेश सुद्धा प्रभारी अधिकाऱ्याच्या कायम प्रथम स्थानी असतात त्यामुळे अग्नीशास्त्रांचा शोध सतत चालू असतो दिनांक २३ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती मिळाली की गुणवडी परिसरात एम एच 42 BH 5473 या गाडीवरचा युवक दोन दिवसापासून त्याच्याकडे अग्निशस्त्र असून तो गोपनेरी त्या अग्नि शस्त्र विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे. सदरची माहिती पोलीस निरीक्षक महाडिक यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांना सांगितली त्यांनी तपासी पथकातील तुषार चव्हाण, दशरथ कोळेकर , दशरथ इंगोले, अजय सीताप शाहू राणे, कल्याण खांडेकर तसेच शिंदे जामदार या तपासी पथकातील अंमलदारांना  सांगितली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख यांनी ही संशयित गाडी गुणवडी नदीच्या ब्रिजच्याजवळ पकडली सदर गाडीचा चालक विक्रम शरद माने वय 23 वर्ष राहणार गुणवडी तालुका बारामती याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडी ची उत्तर दिले नंतर सदर इसमा कडून गावठी पिस्तूल किंमत अंदाजे 30 हजार तीन जिवंत काडतुसे  व वरील क्रमांकाची मोटरसायकल किंमत अंदाजे चाळीस हजार असा 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीचे तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले सदर आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळालेली असून त्याबाबत सुद्धा आणखी कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे. याबाबत अग्नीशास्त्राबाबत कुणालाही माहिती असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक महाडिक यांच्या व्हाट्सअप वर मेसेज करावा अथवा डायल वन वन टू ला माहिती द्यावी अथवा पोलीस स्टेशन चा जो मोबाईल क्रमांक वितरित केलेला आहे त्यावर माहिती द्यावे आपले नाव गुपित ठेवले जाईल.

No comments:

Post a Comment