इलेक्ट्रिक गाड्यांच्या बुकिंगपोटी ८१ ग्राहकांकडून रक्कम घेत त्यांना बाईक न देता त्यांची १९ लाख ६७ हजारांची फसवणूक... बारामती :- इलेक्ट्रिक गाड्यांच्या बुकिंगपोटी ८१ ग्राहकांकडून रक्कम घेत त्यांना बाईक न देता त्यांची १९ लाख ६७ हजारांची फसवणूक करण्यात आली. शोरूममध्ये कार्यरत
कर्मचाऱ्यांचाही तीन महिन्यांचा सुमारे दीड लाख
रुपये पगार न देता फसवणूक केल्याचा प्रकार
बारामतीत घडला. या प्रकरणी जोव्ही इलेक्ट्रिक
लिमिटेडच्या चेअरमन ज्योती आढाव व सीईओ
विनोद अनंता कदम (रा. सिंहगड रोड, नांदेड
सिटी, पुणे) यांच्या विरोधात बारामती शहर
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही तीन महिन्यांचा सुमारे दीड लाख रुपये पगार न देता फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी सुहास सुरेश हिप्परकर
(रा. कळंब, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली. २४ ऑक्टोबर २०२२ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.९० हजारांची गाडी ३० हजारात देण्याचे मान्य करत ही फसवणूक झाली आहे. सुरुवातीला ज्यांनी बुकिंग केले, त्यांचा व इतरांचा विश्वास बसावा, यासाठी काही गाड्या वितरित केल्या. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. अवघ्या ३० हजारात गाडी मिळत असल्याने बुकिंग वाढले.बुकिंगची रक्कम ऑनलाइन, चेक
किंवा रोख स्वरूपात घेतली असून,त्यानुसार येथील आउटलेटमध्ये ८१ ग्राहकांची १९ लाख ६७ हजारांची रक्कम घेतली गेली. वारंवार वाहनांची मागणी करूनही पुरवठा करण्यात आला नाही.अखेर बारामतीतील शोरूमला टाळा लावण्यात आला. या कंपनीने फिर्यादीसह येथे कार्यरत अन्य कर्मचाऱ्यांचा जानेवारी
ते मार्चचा सुमारे दीड लाख रुपये पगारही दिला नाही. फिर्यादी व अन्य कर्मचारी स्थानिक असल्याने बुकिंगसाठी रक्कम भरलेल्यांनी त्यांच्याकडेच तगादा सुरु केला. कंपनीच्या चेअरमन व सीईओ यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment