वडगांव निंबाळकर येथे बहुजन हक्क परिषदेच्या वतीने 'इफ्तार पार्टी'चे आयोजन...
वडगांव निंबाळकर:- पवित्र रमजानच्या निमित्त वडगांव निंबाळकर येथे मुस्लिम-मज्जिद येथे बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष *पैलवान नानासाहेब मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत 'इफ्तार पार्टी' चे आयोजन करण्यात आले होते.वडगांव मधिल हिंदू-मुस्लिम धर्मातील एकी आदर्शवत असुन इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हे संबध अधिकच दृढ होतात असे प्रतिपादन राज्य युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांनी केले. याप्रसंगी उपस्थित राहून उपस्थित मुस्लिम बांधवांना सर्वांच्या वतीने रमजान-ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या..
यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने उपस्थित सर्वांचे मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,वाकी गावचे सरपंच किसन बोडरे,पांडुरंग घळगे,सोनु खोमणे,विशाल चव्हाण,पुष्कराज गायकवाड,आण्णासो मदने,लखन पवार,तेजेश शहा,परशुराम पाचर्णे,प्रतिक कुचेकर आदि मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.मुस्लिम समाजाच्या वतीने हाफिज इब्राहीम फलाही,
हाफिज अबुल कलाम फलाही, शहाबुद्दीन आब्बास मणेर(सर),टिपू भालदार,इकबाल शेख,वासिम पठान,कय्युम पठान,जुबर इनामदार,पिन्टु बागवान,सलमान पठान,मतिन पठान,जहाँगीर शेख,सलमान आत्तार,जमीर आत्तार आदि नी आभार मानले...
No comments:
Post a Comment