बारामतीत वाढती गुन्हेगारी संपता संपेना, कधी गोळीबार तर कधी कोयत्याने वार तर आत्ता दगडाने तरुणाचा खून... बारामती :- बारामतीत वाढती गुन्हेगारी संपता संपेना, कधी गोळीबार तर कधी कोयत्याने वार तर आत्ता दगडाने ठेचून खून नक्की चाललंय काय?अवैध धंदे वाढल्याने गुन्हेगारी वाढत असल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे चर्चिले जात आहे, नुकताच बारामती तालुक्यातील
सांगवी येथे बुधवारी (दि. १२) सकाळी अज्ञाताने
युवकाचा दगडाने ठेवून खून झाल्याची घटना उघडकीस
आली. या घटनेत विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.विनोद फडतरे हा युवक सकाळी जुना सांगवी पणदरे रस्त्यावरील शेतात आपली दुचाकी (एमएच ४२ एक्स ६२९५) वरुन गेला होता. त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी पाडून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. या घटनेबाबत माळेगाव पोलिसांना माहिती
देण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment