खळबळजनक...खाजगी ॲकॅडमी,कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द करण्याची होत आहे मागणी..
बारामती (प्रतिनिधी) :- येथील चैतन्य ॲकॅडमी, वेदांत ॲकॅडमी, आदित्य ॲकॅडमी,आचार्य अॅकॅडमी व इतर खाजगी कोचिंग क्लासेस, आदित्य इंटरनॅशनल स्कूल, चैतन्य यांनी इंटरनॅशनल आर.टी.ई.स्वयंअर्थसहाय्यीत व शाळांचे विनियमन स्कूल कायद्याचे स्थापना व अधिनियनाचे उल्लंघन केले असल्याने,
संस्थांच्या इमारतीमध्ये अग्निशमन व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असल्याने संबंधित शाळांचे व कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द करण्याची मागणी मोहसीन पठाण यांनी महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त यांच्याकडे केली आहे. तत्पूर्वी मोहसीन पठाण यांनी सदर संस्थांविषयी अधिकार माहिती कायद्याअंतर्गत बारामती नगरपरिषदेच्या अग्निशम विभागाकडे सदर संस्थांच्या इमारतीमध्ये अग्निशमन व्यवस्था आहे किंवा कसे याबाबतची माहिती मागितली असता सदर संस्थांच्या नगरपालिकेच्या विभागाकडून कोणत्याही प्रकारची अग्निशमन परीक्षण फायर इमारतीमध्ये अग्निशमन ऑडिट करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरी याबाबत मोहसीन अकबर पठाण हे पुढील काळात न्यायालयात याचिका
दाखल करणार असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले.
No comments:
Post a Comment