पोस्ट ऑफिस चे नवीन सुसज्ज जागेत स्थलांतर...
मंचर:- मंचर येथील डाकघर सन १९७५ सालापासून ग्राहकांना अविरत सेवा देत
आहे. पूर्वी मंचर पोस्ट ऑफिस हे पहिल्या मजल्यावर स्थित होते त्यामुळे जेष्ठ
नागरिकांना पोस्ट ऑफिस चे व्यवहार करणे सोयीस्कर नव्हते. म्हणून दिनांक.०१.०५.२०२३ रोजी मंचर पोस्ट ऑफिस "रुक्मिणी सदन" हॉटेल शामनंद च्या मागे,या नवीन जागेत, तळ मजल्यावर स्थलांतरीत झाले आहे. या कार्यक्रमास श्री गोविंद जाधव, मुख्य अधिकारी, मंचर नगर परिषद, श्री बी.पी.एरंडे अधिक्षक
डाकघर पुणे ग्रामीण विभाग, पुणे, श्री पी.टी.भोगाडे डाक निरीक्षक, राजगुरुनगर
उपस्थित होते.सदर कार्यक्रमात श्री बी.पी.एरंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना
पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती दिली. पोस्ट ऑफिस मध्ये अनेक लघु
बचत योजना जनतेच्या सोयीसाठी केंद्र सरकार द्वारा चालविल्या जातात जसे,बचत खाते, आर.डी, सुकन्या समृद्धी योजना, मासिक प्राप्त योजना, जेष्ठ नागरिक बचत योजना, पी.पी.एफ., राष्ट्रीय बचत पत्रे, किसान विकास पत्रे इ.
पोस्ट ऑफिस बचत योजना ह्या लोकाभिमुख असून सामान्य जनतेच्या सोईच्या व फायद्याच्या असतात. तसेच त्यावर मिळणारे व्याज हे राष्ट्रीयकृत/खाजगी बँकाच्या तुलनेने जास्त असते, म्हणुन जनतेकडून अशा योजनांना उत्कृष्ठ प्रतिसाद मिळतो.नुकतेच बजेट २०२३-२४ मध्ये महिलासाठी नवीन 'महिला सम्मान बचत पत्र' ही
योजना सुरु केली असुन त्यावर ७.५% दराने कंपाउंड पद्धतीने व्याज मिळते.म्हणुन जास्तीत जास्त महिला व पालकांनी आपल्या मुलीसाठी व स्वतःसाठी या योजनाचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.
No comments:
Post a Comment