ट्रकच्या चालकाचे अपहरण करून वाहनातून सुमारे ३५ लाख रुपयांचे लोखंडी रॉड लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद केले... बारामती:- ट्रकमधून माल घेऊन निघालेल्या ट्रकच्या चालकाचे अपहरण करून वाहनातून सुमारे ३५ लाख रुपयांचे लोखंडी रॉड लुटणाऱ्या दिग्विजय श्रीकांत जाधव (वय २१),लक्ष्मण भीमराव कुचेकर (वय ३०), सुहास रावसाहेब
थोरात (वय २८, तिघे रा. उदमाईवाडी, ता. इंदापूर, जि.पुणे), प्रथमेश मनोज शेलार (वय २३, रा. घोलपवाडी,ता. इंदापूर), मयूर प्रकाश शिंदे (वय २८, रा. तावशी,ता. इंदापूर) व स्वप्निल दत्तात्रय निंबाळकर (वय २८, रा.३९ फाटा, सणसर, ता. इंदापूर) अशी पोलिसांनी अटक
केलेल्या दरोडेखोर तरुणांची नावे आहेत.
अशी घडली घटना: या प्रकरणी मारुती मोतीलाल
करांडे (वय ३०, रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली)यांनी फिर्याद दिली होती. मंगळवारी (दि. ९ मे) रोजी ही घटना घडली होती. करांडे हे स्वतःच्या मालकीचा अशोक लेलॅण्ड ट्रक (एनएल-०१, एबी-३५७७) मधून बारामती 'एमआयडीसी'तील माऊली कृपा ट्रान्सपोर्ट मार्फत कर्नाटक येथून लोखंडी रॉड भरून
पुण्यात मुंढवा येथील भारत फोर्जमध्ये घेऊन
जाण्यासाठी निघाले होते. भिगवणजवळ बबिता ढाबा येते ते पहाटे ३ च्या सुमारास जेवणासाठी थांबले.त्यानंतर ते गाडीतच झोपले असताना दरवाजा उघडून तिघांनी आत येत त्यांना दमदाटी करत चार हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर आरोपींनी ट्रेलर चालू करून तो बारामतीच्या दिशेने आणला.भिगवणमध्ये त्यांना आणखी तीन साथीदार मिळाले. त्यांनी या ट्रकमधून ३५ लाख रुपये किमतीचे लोखंडी
रॉड चोरले. तसेच १९ लाख रुपयांचे वाहनही त्यांनी नेले. करांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात दरोड्याचा व जबरी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरोडेखोरांना ट्रेलरसह पकडले: यानंतर आरोपींनी
बारामती तालुक्यातील कन्हेरी गावच्या हद्दीत पालखी महामार्गालगत हे वाहन आणले. तेथून दुसऱ्या वाहनात हे रॉड टाकून ते दुसरीकडे नेऊन विकण्याचा त्यांचा हेतू होता. करांडे यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत बारामती तालुका पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पथके रवाना केली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू
असतानाच ट्रेलरसह दोन दरोडेखोरांना जागीच
पकडण्यात आले. त्यांच्याकडून इतर साथीदारांची माहिती घेत आजूबाजूच्या झाडा-झुडपात लपून बसलेल्या अन्य चार जणांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.
No comments:
Post a Comment