अनैतिक संबंधावरुन कोयत्याने जीवे
मारण्याचा प्रयत्न...
पुणे:- गुन्हेगारी वाढत चालली असल्याचे प्रकरणे पुढे येत असतानाच अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन मुलाने कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.याप्रकरणी समीर अल्लाबक्ष शेख (वय २१, रा. घोरपडी याला वानवडी पोलिसांनी
अटक केली आहे. तर त्याचे साथीदार साहिल
अल्लाबक्ष शेख (वय १९), अल्लाबक्ष शेख यांच्यावर दाखल केला आहे.या घटनेत वसीम हुसेन शेख (वय ३७, रा.गल्ली नं. २, फैलवाली चाळ, घोरपडी) हा जखमी झाला आहे. ही घटना फैलवाली चाळ येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय समीर याला होता. त्या रागातून समीर याने फिर्यादी यांना बोलावून घेतले. इतरांशी संगनमत करुन फिर्यादी यांच्यावर धारदार हत्याराने पाठीवर, डोक्यावर, खाद्यांवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच भाडण
सोडविण्यासाठी आलेल्या रफिक याच्यावरही
हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले.
पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment