इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी,एक गावठी पिस्टल,१ जिवंत काडतुस सह एकास अटक..
इंदापूर:- दिनाक १५.०५.२०२३ रोजी दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास गुन्हे शोध
पथकास मौजे. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे येथील वेताळ बाबा मंदिरा जवळ इसम नामे संग्राम विलास मदने वय २७, रा. काटी, ता. इंदापूर जि.पुणे हा त्याचे कंबरेला गावठी पिस्टल लावून थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथक तात्काळ सदर ठिकाणी रवाना झाले. संख्यीत
इसम संग्राम मदने यास पोलीस आल्याचे चाहूल लागताच तो सदर ठिकाणाहून पळून जावू लागला असता त्याला पथकाने पाठलाग करून पकडून त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरलेला एक गावठी पिस्टल व पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. त्यास ताब्यात घेवून त्याने बेकायदेशे, विना परवाना पिस्टल हे अग्नीशस्त्र जवळ बाळल्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंद
करून त्यास अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री. अंकित गोयल , अप्पर पोलीस
अधिक्षक श्री.आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे , पोनि दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, नागनाथ पाटील, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, विनोद लोखंडे, गजानन वानूळे, गणेश डेरे अकबर शेख, विकास राखुंडे, होमगार्ड संग्राम माने यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment