संतापजनक..पोषण आहार साहित्य चोरी प्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षकांवर निलंबित व गुन्हा दाखल करण्याची मागणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 14, 2023

संतापजनक..पोषण आहार साहित्य चोरी प्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षकांवर निलंबित व गुन्हा दाखल करण्याची मागणी..

संतापजनक..पोषण आहार साहित्य चोरी प्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षकांवर निलंबित व गुन्हा दाखल करण्याची मागणी..
गंगापूर:- जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आलेला किराणा सामानाची चोरी करून विक्री करणाऱ्या शाळेचा मुख्याध्यापक आणि शिक्षकांविरोधात निलंबनाची कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकी पेशाला अशोभनीय अशी ही घटना गंगापूर
तालुक्यातील कनकोरी येथील जिल्हा परिषदेच्या
शाळेत महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली होती. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आलेला किराणा साहित्य घरी घेऊन जाणारे शाळेचे मुख्याध्यापक फीरोज नादर तडवी,वसंत दंगल वाडीले यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते. शाळेतील किराणा साहित्य घेवून परागंदा होण्याच्या तयारीत असल्याचा संतापजनक प्रकार
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता.
या शाळेतील शिक्षकांचा पोषण आहारासाठी आलेला किराणा घरी घेऊन जाण्याचा प्रकार गावातील माजी शालेय समीती अध्यक्ष प्रताप पवार आणि चाणाक्ष मंडळीच्या यापूर्वीच अनेक वेळा निदर्शनास आले पोषन आहाराचे साहित्य न शिजवता नेहमी चोरी करून, विक्री करतांनी ग्रामस्थाना दिसायचे. या बाबत प्रताप पवार आणि ग्रामस्थानी त्यांना समज देवुन सुधारण्याची संधी दिली होती. तरी सुध्दा हा प्रकार
चालुच होता. परंतु मुख्याध्यापक आणि शिक्षक काही सुधारायला तयार नव्हते. महाराष्ट्र दिनी शाळा सोडून शिक्षक गाडीवर पिशवी
घेऊन जाताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ शिक्षकांना अडवून पिशवीत काय आहे?त्याची तपासणी केली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आलेले किराणा सामान पिशवीत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. त्यामध्ये गोडेतेल, वाटाणे, मठ, मीठ, हळद व इतर वस्तूंचा समावेश होता.चोरीचा प्रकार बंद होतच नसल्याने त्यांना रंगेहाथ पकडुन व्हिडिओ शुटिंग करून त्याच्या कडुन गुन्हा केल्याचे मान्य करून व लिहुन घेऊन त्यांचे चोरीचे सबळ पुरावे जमा देखील करण्यात आले असून संबंधित पोषण आहाराचे साहीत्याची चोरी करून
विक्री करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कनकोरी येथील जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष तथा
संचालक गंगापूर खरेदी-विकी संघ संचालक यांनी
गंगापूर येथील गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर प्रताप पवार यांची स्वाक्षरी आहे.

No comments:

Post a Comment