हॉटेल,लॉजमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय? तरुण बिघडण्याची शक्यता..
कुरकुंभ:-पुणे-सोलापूर, पुणे-बारामती, पुणे-सोलापूर, बारामती-मोरगाव, जेजुरी, बारामती-भिगवण आणि अष्टविनायक
महामार्गालगतच्या काही हॉटेल व लॉजमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू आहे. याकडे पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कारवाई
करण्याची गरज निर्माण झाली आहे.
परप्रांतीय व्यक्तींनी पुणे-सोलापूर, आणि अष्टविनायक महामार्गालगत दुर्लक्षित व डबघाईला आलेले अनेक हॉटेल, लॉज मूळ मालकांकडून भाडेतत्त्वावर घेऊन तेथे वेश्याव्यवसाय सुरू केला आहे. मात्र, याकडे पोलिसांचे लक्ष नसल्याने हा व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. मूळ
मालकांकडून अनेकदा यासाठी करारनामा केला जात नाही. त्या ठिकाणी अनधिकृतपणे परप्रांतीय खुलेआमपणे वेश्याव्यवसाय करत आहेत. महिला व मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जाते. यासाठी परराज्यांतील महिला व मुलींचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे या परप्रांतीयांचे वेगवेगळ्या राज्यांशी थेट कनेक्शन तयार
झाले आहे. यामधून भविष्यात मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दोन दिवसांपूर्वीच कुरकुंभ परिसरातील वेश्याव्यवसाय चालणाऱ्या एका लॉजवर तुफान हाणामारी झाल्याची चर्चा आहे. मात्र, प्रकरण उघड झाल्यास तेथील वेश्याव्यवसाय बंद होईल या भीतीने हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत न नेता
मिटविण्यात आले. अशा प्रकारांमुळे स्थानिक रहिवासी वैतागून गेले आहेत. या गंभीर प्रकारांकडे पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment