स्थानिक गुन्हे शाखेची जबरदस्त कारवाई
अपहरण करणारे सराईत आरोपींच्या मुसक्या आवळून खुनाचा गुन्हा उघडकीस...
पुणे:- कुसगाव ता भोर जि पुणे या गावातील अजय अंकुश मांजरे हा दि. ०८/०५/२०२३ पासून मिसींग असलेबाबत
राजगड पोलीस स्टेशन येथे दि. १६/०५/२०२३ रोजी मानव मिसींग रजि. नंबर २९/२०२३ प्रमाणे दाखल करणेत आलेली
होती. सदर मिसींगचे अनुषंगाने यातील मिसींग व्यक्तीचा अपहरण करून खुन झाला असल्याची गोपनीय बातमी स्थानिक
गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाल्याने बातमीची खात्री करणेकरीता स्थानिक
गुन्हे शाखेची पाच तपास पथके तयार करून मिसींगचा तपास सुरू केला, परंतु मिसींग अजय मांजरे याचा मोबाईल
नंबरवरून व्हॉट्स अॅप चॅटींग चालू होती, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान दि १९/०५/२०२३ रोजी राजगड
पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २१३/ २०२३ भा.दं.वि.का.क. ३६४,३४ प्रमाणे तीन व्यक्तींविरूद्ध मिसींग अजय मांजरे याचा
भाऊ अक्षय अंकुश मांजरे याने गुन्हा दाखल केला.
मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सो यांचे मागदर्शन व सुचनाप्रमाणे तपास करत असताना गुन्हयातील
पाहिजे आरोपी नामे १) दिपक धनाजी जगताप वय ३१ वर्षे, रा. रांजे ता भोर जि पुणे २) सागर नानासाहेब लिमन, वय
२६ वर्षे, रा. पारवडी ता. भोर जि. पुणे हे खेड शिवापूर परीसरात आले असल्याची बातमी स्थागुशाचे पथकाला
मिळाल्याने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. सदरचे आरोपी हे सराईत असून त्यांचेवर खुनाचा प्रयत्न,
अवैध पिस्टल बाळगून त्याची विक्री करणे, अशा प्रकारचे गुन्हे वेगवेगळया पोलीस स्टेशनला दाखल आहेत. आरोपींना
राजगड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासात आरोपींनी अपहरण केलेल्या अजय
अंकूश मांजरे याचा खुन केला आणि मयत प्रेत वरंधा घाटातून दरीत फेकून दिली असल्याचे निष्पन्न करून प्रेताचा शोध
घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून प्रेताचा शोध घेण्यासाठी सीस्कॅप रेस्क्यू अँड रिलीफ- महाड, शिरवळ
रेस्क्यू टिम, महाबळेश्वर ट्रेकर्स-महाबळेश्वर या टिमची महत्त्वाची भुमिका बजावली आहे. आरोपींनी अजय मांजरे याचे
अपहरण करतेवेळी त्याचेवर पिस्टल रोखले असल्याचे तपासात पुढे आले. त्या अनुषंगाने तपास करून आरोपींनी खून
करून मयताचे प्रेत ज्या चारचाकी वाहनातून घेवून गेले होते, ते वाहन हस्तगत करून त्या वाहनातून तीन गावठी पिस्टल,
आठ जिवंत काडतूसे मिळाली आहेत. आरोपींनी गुन्हयात वापरलेले दोन मोबाईल तसेच अजय मांजरे याचा खुन
केल्यानंतर त्याचा मोबाईल आरोपी घेवून गेले होते, तो मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपींना मा. भोर
न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली असून गुन्हयाचा तपास राजगड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे
शाखा करत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री
आनंद भोईटे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील साो. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मा.
पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, सपोनि नेताजी गंधारे, सपोनि महादेव शेलार, सपोनि राहुल गावडे, पोसई
प्रदीप चौधरी, पोसई अभिजीत सावंत, पोसई गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजु
मोमीण, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, बाळासाहेब कारंडे, हनुमंत
पासलकर, विजय कांचन, हेमंत विरोळे, धिरज जाधव, विक्रम तापकीर, अजय घुले, योगेश नागरगोजे, समाधान
नाईकनवरे, तुषार भोईटे, निलेश सुपेकर, प्रसन्ना घाडगे, प्रमोद नवले, अक्षय सुपे, मुकुंद कदम, यांचे मदतीने केली
No comments:
Post a Comment