बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे हरभरा खरेदी केंद्रावर १०२५ क्विंटल हरभरा खरेदी...
बारामती:- बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात यांत्रिक चाळणी येथे हमीदरा नुसार नाफेड मार्फत मार्केटींग फेडरेशच्या वतीने दि. ३/४/२०२३ पासुन सुरू असलेल्या चना (हरभरा) खरेदी केंद्रावर दि. २७/४/२०२३ अखेर नोंदणी केलेल्या १०१ शेतक-यांचा १०२५ क्विंटल हरभरा खरेदी करणेत आला. नाफेड मार्फत सब एजंट म्हणुन निरा कॅनॉल संघ यांनी काम पाहिले. हरभरा खरेदी केंद्राची मुदत संपली आहे अशी माहिती माहिती प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
प्रति क्विंटल रू.५,३३५/- या हमीदराने हरभरा खरेदी झाली असल्याने हरभ-यांची किंमत रू. ५४.६८ लाख होत आहे. हमीदरा पेक्षा बाजार आवारातील हरभ-यांचे दर कमी असल्याने शेतक-यांना याचा आर्थिक फायदा झाला आहे, होत आहे. शासनाने सदर खरेदी केंद्राची नोंदणी मुदत वाढवुन पुन्हा खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतक-यांकडुन होत असल्याचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment