धक्कादायक..मैत्रीणीकडून 'जीवलग' मित्राची चाकूने सपासप वार करून हत्या...
पुणे:-अभ्यासासाठी जीवलग मित्राच्या खोलीवर गेल्यानंतर तेथे झालेल्या वादातून दोघांची चांगलीच बाचाबाची झाली. वादीवाद झाल्यानंतर राग अनावर झाल्याने मैत्रीणीने जीवलग मित्रावर चाकुने सपासप वार करून त्याचा खून केला. दरम्यान, तिला देखील चाकू लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास लोणीकंद पोलीस स्टेशनच्या अंकित असलेल्या वाघोली पोलिस चौकीमधील रायसोनी कॉलेज जवळील मित्राच्या खोलीमध्ये घडली आहे. अनुजा महेश पन्हाळे(21, मुळ रा. कोलार जवळ,जि.अहमदनगर असे जखमी झालेल्या
तरूणीचे नाव आहे. तिने यशवंत अशोक मुंडे ( 22, मुळ रा. लातूर) याचा खून केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत मुंडे आणि अनुजा पन्हाळे हे दोघेही वाघोली परिसरातील रायसोनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. कॉलेजमध्ये परीक्षा सुरू असल्याने दोघेही एकत्रित अभ्यास करीत होते. रविवारी रात्री अनुजा पन्हाळे ही यशवंत मुंडेच्या खोलीवर
अभ्यासासाठी गेली होती. सोमवारी पहाटेच्या
सुमारास दोघांमध्ये नाजुक कारणावरून वाद
झाले. वादीवाद चांगलाच भडकल्यानंतर अनुजाने
खोलीमध्ये असलेला भाजी कापण्याचा चाकू
हातात घेवुन यशवंत मुंडेवर सपासप वार केले.
दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. तीक्ष्ण
चाकुचे वार झाल्याने यशवंतचा मृत्यू झाला तर
अनुजा पन्हाळे देखील जखमी झाली. दरम्यान,
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस
स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक निखील पवार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुजा पन्हाळे हिला उपचारासाठी
रूग्णालयात दाखल करण्यात आले याप्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निखील पवार करीत आहेत.
No comments:
Post a Comment