सौ. सारिका रामचंद्र लोखंडे यांना महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

सौ. सारिका रामचंद्र लोखंडे यांना महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित...

सौ. सारिका रामचंद्र लोखंडे यांना महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित...                                             सातारा:-सातारा येथील खटाव तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायतीच्या स्तरावर सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. सारिका रामचंद्र लोखंडे यांना महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने
ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. सारिका लोखंडे यांनी ग्रामपंचायत स्तरावरील
सामाजिक कार्यात विशेष आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.या मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment