धक्कादायक.. बारामतीत कुणाच्या आशिर्वादाने चालू होता गुटखा,प्रशांत गांधीचा तब्बल ४८ लाखांच्या गुटख्यावर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 18, 2023

धक्कादायक.. बारामतीत कुणाच्या आशिर्वादाने चालू होता गुटखा,प्रशांत गांधीचा तब्बल ४८ लाखांच्या गुटख्यावर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई...

धक्कादायक.. बारामतीत कुणाच्या आशिर्वादाने चालू होता गुटखा,प्रशांत गांधीचा तब्बल ४८ लाखांच्या गुटख्यावर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई...
 
बारामती :-बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ४८ लाखांचा हिरा पान मसाला व रॉयल गुटख्याचा मुद्देमाल जप्त करत दादा उर्फ नारायण रमेश पिसाळ (रा.प्रगतीनगर
क्रिएटिव्ह अकॅडमी,बारामती, जि. पुणे) शरद सोनवणे रा.सांगोला,जि.सोलापूर ) यांच्यासह प्रशांत गांधी (रा. बारामती,जि. पुणे) यांच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अभिजीत
दत्तात्रय एकशिंगे यांच्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३९४,३४ अन्वये तसेच कलम ३३८,१८८,३३८, २७३,२७२ अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६ कलम २६(२)(i),२७(३)(d),२७(३)(e), २६(२),(iv ) ३० (2),(a) ५९
(iii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती शु. जी. कर्णे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर
यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, बारामती एमआयडीसी परिसरामध्ये चौधरी वस्ती रोडला MH.10.CR.5794 हा आयशर गुटखा भरून उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार
स्थानिक गुन्हे शाखेने खात्री करत गाडी चालक दादा उर्फ नारायण रमेश पिसाळ याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने हा माल सांगोल्याचे शरद सोनवणे यांचा असून, तो माल बारामतीच्या प्रशांत गांधी यांना देण्यासाठी आणल्याची माहिती दिली. यामुळे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,बारामतीचे पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांच्या
मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस कर्मचारी अभिजीत एकशिंगे, पोलीस कर्मचारी गोरख पवार, पोलीस कर्मचारी स्वप्निल अहिवळे यांच्या पथकाने केलेली आहे

No comments:

Post a Comment