बारामतीचे आक्रमक सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र टिंगरे यांची भाजपच्या मुख्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड. बारामती:- सामान्य कार्यकर्त्याचा थेट वरच्या फळीतीली नेत्याच्या यादीत समावेश.भाजप ने मिशन बारामती हाती घेतले आहे . भाजपच्या नेत्यांचा बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदार संघात वावर वाढलेला असतानाच भाजप च्या प्रदेश कार्यकारिणी मध्ये बारामतीच्या मच्छिन्द्र टिंगरे यांचा समावेश केला आहे.भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मच्छिन्द्र टिंगरे यांना निवडीचे मुबंई येथील मुख्य कार्यालयात निवडीचे पत्र दिले. भाजप ने अतिशय सामान्य कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ता असलेल्या मच्छिन्द्र टिंगरे यांची थेट वरच्या फळीतील नेत्याच्या यादीत समावेश केल्यामुळे राजकीय चर्चाना उधान आलं आहे.
प्रदेश कार्यकारिणीत विशेष निमंत्रीत सदस्य असलेली कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. या सदस्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांचा तसेच केंद्रीय मंत्री, राज्यातील सर्व विद्यमान मंत्री, आमदार, प्रमुख माजी आमदार खासदार वं अतिमहत्वाच्या नेत्याच्या समावेश करण्यात आला असून या कार्यकारीनीला विशेष कार्यकारिणी चा दर्जा देण्यात आला आहे. मच्छिन्द्र टिंगरे यांचा देखील या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.भाजपा ने सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्यामुळे बारामतीच्या राजकीय कट्ट्यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मच्छिन्द्र टिंगरे यांचं बारामतीच्या सामाजिक चळवळीत मोठं योगदान आहे. बारामतीतील अनेक मोठ्या राजकीय सामाजिक विषयांनावर मच्छिन्द्र टिंगरे यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशातच आता भाजप सारख्या सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कार्यकारिणी मध्ये निवड झाली आहे.
दरम्यान याबाबत मच्छिन्द्र टिंगरे यांनी मोदीजींचा विचार कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असून भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले आहे... जुन्या अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन घेउन पक्ष विस्तार करण्यासाठी पर्यत्न करणार असल्याचे मच्छिन्द्र टिंगरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment