"माझ्या गाडीत बस व कपडे काढ" असे बोलल्याने माजी सरपंचाविरूध्द विनयभंग,अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 20, 2023

"माझ्या गाडीत बस व कपडे काढ" असे बोलल्याने माजी सरपंचाविरूध्द विनयभंग,अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल...

"माझ्या गाडीत बस व कपडे काढ" असे बोलल्याने माजी सरपंचाविरूध्द विनयभंग,अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल...                                                                               पुणे :- माजी सरपंच विरुद्ध दाखल तक्रारी बाबत मिळालेल्या माहिती नुसार घराच्या मिळकतीमध्ये
बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल चौकशी
लावण्याबाबत अर्ज केल्यानंतर चौकशी सुरू
झाल्याचा राग मनात धरून महिलेचा विनयभंग
केल्याप्रकरणी माजी सरपंचाविरूध्द लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग,अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.विठ्ठल राजाराम शितोळे (रा. कोरेगाव मुळ,पुणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक महिती अशी की,
फिर्यादी यांनी माजी सरपंच विठ्ठल राजाराम
शितोळे यांच्याविरूध्द घराच्या मिळकतीमध्ये
बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल चौकशी
लावण्याबाबत अर्ज केला होता. सदरील
अर्जाची चौकशी सुरू झाल्यानंतर त्याचा राग
मनात ठेवुन शितोळेने दि. 5 मे 2023 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान
फिर्यादी या पायी जात असताना त्यांना ओढुन
माझ्या गाडीत बस व कपडे काढ असे बोलुन
विनयभंग केला. फिर्यादी या अनुसूचीत
जातीच्या आहेत हे माहित असताना देखील
त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य
केले. घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीचे वडिल
शितोळे याच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले
असता त्यांना देखील दमदाटी केली. त्यामुळे विठ्ठल शितोळे याच्याविरूध्द विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास
सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई करीत आहेत.याबाबत  पीडित महिलेने मानवाधिकार रचनात्मक सेवा संस्थान कडे लेखी निवेदन दिल्याने त्याची  तात्काळ दखल घेत मानवाधिकार रचनात्मक सेवा संस्थान(आंतरराष्ट्रीय)च्या सौ. छाया खैरनार
संचालक आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा, मानवाधिकार रचनात्मक सेवा संस्थान (आंतरराष्ट्रीय) यांनी या तक्रारी प्रत वरिष्ठ पातळीवर दिल्याने याची दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.तसेच प्रल्हाद तांदळे, संस्थांपक अध्यक्ष यांनी याकामी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment