धक्कादायक..भांडणे सोडविण्यास आलेल्या इसमाचा कोयत्याने व डोक्यात दगड घालून केला खून..
मुंढवा:-भांडण सोडवणं आलं जीवाशी,नुकताच घडलेली घटना कंपनीच्या बाहेर रोडवर भांडण करणाऱ्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या मालकालाच भांडणाऱ्यांनी
कोयत्याने वार करुन त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा-केशवनगरमध्ये घडला.रवींद्र दिगंबर गायकवाड (वय ६०, रा. गायकवाड आळी, मुंढवा)असे खून झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी मोटारसायकलवरील तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
आकाश जावळे (वय १९), सागर जावळे (वय २२),साहिल सुतार (वय १९, तिघेही रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सुन्द्रेश सुभाषचंद्र जैस्वार (वय ३९, रा.साईनाथनगर, वडगाव शेरी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु.रजि. नं. १४४/२३) दिली आहे. हा प्रकार मुंढवा येथील केशवनगरमधील गायकवाड वस्ती येथे रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.याबाबत पोलिसांनी सांगितले की, रवींद्र गायकवाड यांची कल्याणी इंजिनिअरिंग ही कंपनी आहे. फिर्यादी या ठिकाणी कामाला आहेत.कंपनीच्या बाहेर रोडवर रविवारी दुपारी तिघे जण आपसात भांडत होते. ते पाहून गायकवाड तेथे गेले. त्यांनी भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला.तेव्हा त्यांनी गायकवाड यांच्यावरच कोयत्याने डोक्यात, पाठीवर वार केले.
दगडाने मारहाण करुन ते मोटारसायकलवरुन पळून गेले. जखमी अवस्थेत गायकवाड यांना रुग्णालयात नेण्यात आले.तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment