वसंत मुंडे यांना उत्कृष्ट सामाजिक पत्रकारिता पुरस्कार;दुबईत लोकमतच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरव.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

वसंत मुंडे यांना उत्कृष्ट सामाजिक पत्रकारिता पुरस्कार;दुबईत लोकमतच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरव..

वसंत मुंडे यांना उत्कृष्ट सामाजिक पत्रकारिता पुरस्कार;दुबईत लोकमतच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरव..
मुंबई (प्रतिनिधी)- लोकमत मीडिया ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दुबई येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना या वर्षीचा 'एक्सलन्स इन सोशल जर्नलिझम अवार्ड' देऊन  सांस्कृतिक कार्यमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार, लोकमतचे प्रमुख मा. राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. माध्यमक्षेत्रातून आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेले वसंत मुंडे हे पहिले व एकमेव आहेत.
महाराष्ट्रासह देशभरात मराठी वृत्तपत्रातील आघाडीच्या लोकमत मिडिया समूहाचा या वर्षीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा रविवार २८ व २९ मे रोजी दुबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमतचे प्रमुख राजेंद्र दर्डा, आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री नुसरत भरूचा, दुबई स्पोर्ट सिटी चे अब्दुल रहमान फलकनाथ, मसाला किंग अल हिदा ग्रुपचे धनंजय दातार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मराठी पत्रकारीतेत वीस वर्षांपासून कार्यरत आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे मजबूत संघटन‌ उभे करून वृत्तपत्रांचे अर्थकारण व पत्रकारांच्या समस्या याविषयी सकारात्मक बदल करणारे, तसेच डिजिटल मिडियात, भारतातील पहिला नवीन प्रयोग करणारे व पत्रकारितेच्या माध्यमातून रचनात्मक काम उभे  करणारे वसंत मुंडे यांच्या कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. लोकमतचा माध्यम क्षेत्रातील पुरस्कार मिळालेले वसंत मुंडे पहिले ठरले आहेत.
प्रतिकूल परिस्थितीला हरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, प्रशासकीय पातळीवर बदल घडवणार्‍या विषयांवर त्यांनी विपुल लिखाण केले आहे. तर कोरोनात पत्रकार संघाच्या माध्यमातून सोळाशे पिशवी रक्त संकलन, ताळेबंद अडकलेल्या आणि अडचणीत सापडलेल्या पत्रकारांना विविध माध्यमातून मदत. तर आर्थिक अडचणीत सापडलेल्या वृतपत्रांनी पारंपरिक आर्थिक धोरण बदलून उत्पादन खर्चावर आधारित विक्री किंमत वाढवली पाहिजे यासाठी वृत्तपत्रांच्या अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या या विषयावर राज्यभरात सात अधिवेशने घेऊन जनजागृती केली. यातून चारशे वृत्तपत्रांनी किमती वाढवण्याचा निर्णय घेतला. सामान्य माणसाचा लोकशाहीतील आवाज असलेली वृत्तपत्रे व पत्रकारांच्या समस्या मांडण्यासाठी वसंत मुंडे यांनी कणखर भूमिका घेतली. याची दखल घेऊन या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment