भाजपही भाकरी फिरवण्याच्या तयारीत भाजपच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 2, 2023

भाजपही भाकरी फिरवण्याच्या तयारीत भाजपच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल..

भाजपही भाकरी फिरवण्याच्या तयारीत
 भाजपच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल..                                                                         मुंबई:- भाजपही भाकरी फिरवण्याच्या तयारीत
भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली,कारण लोकसभेसाठी भाजपने आता कंबर कसली आहे.लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजप नवी टीम उभी करण्याच्या तयारीत आहे.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीत कुणाला स्थान
मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याचीही
उत्सुकता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यभरात नव्या नियुक्त्या करणार असल्याचे कळत आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीत तेव्हा मोठे फेरबदल दिसणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर
जिल्हाध्यक्षपदापासून विविध पदांवर नवे चेहरे
दिसण्याची शक्यता आहे. प्रदेश कार्यकारिणीची नवी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र भाजपात मोठे फेरबदल होत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आज प्रदेश कार्यकारिणी जाहीर करत आहेत. तब्बल 1200 जणांची नवी टीम असणार आहे.राज्यातलं केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेते, विशेष निमंत्रित अशा सर्वांच्या नावांची आज घोषणा
होत आहे. दर तीन वर्षांची भाजपची प्रदेश
कार्यकारिणी बदलते. मात्र मावळती कार्यकारिणी
साडेतीन वर्षांपासून कार्यरत आहे.नव्या कार्यकारिणीत जवळपास 80 टक्के चेहरे नवे
असतील. 6 सरचिटणीस, 16 उपाध्यक्ष, 16 सचिव यांच्यासह 105 जणांची नवी कार्यकारिणी असेल.एरवी काही आमदारांना सरचिटणीस किंवा उपाध्यक्षपद दिलं जाते. मात्र यावेळी त्यांना ही संधी दिली जाणार नाही अशी माहिती आहे. त्याऐवजी सर्व आमदारांना विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात येईल.दरम्यान, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रितया सर्वांची मिळून जवळपास 1200 लोकांची टीम असणार आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी अपेक्षित होती. या कार्यकारिणीच्या माध्यमातून 2024 च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. 48
लोकसभा आणि 200 हून अधिक विधानसभा युती म्हणून जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही एकत्रित हा प्रयत्न करु,त्यामध्ये चांगले यश आम्हाला प्राप्त होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment