खळबळजनक..भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 14, 2023

खळबळजनक..भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी...

खळबळजनक..भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी...
 तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर):- जादूटोणा, भोंदूगिरी, बुवा बाजी चे प्रमाण वाढत असून याला नाहक बळी पडणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे, नुकताच शिरूर तालुक्यात शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत भोंदुगिरी करत पूजा पाठ करुन वेगवेगळे आजार बरे करतो असे भासवून दुखणे बरे करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याने आदिनाथ विश्वनाथ कांबळे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले.तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेला आजारी असल्याने रुग्णालयांतील फरक पडत नसल्याने गावातील आदिनाथ कांबळे हा इसम देवाचे पूजापाठ करुन आजार घालवत असल्याचे समजल्याने महिलेने कांबळे यांची भेट घेतल्याने कांबळे यांनी
देवाची पूजा केली. मात्र महिलेच्या आजारावर काहीही फरक न पडल्याने महिलेले कांबळे यांच्याकडे जाणे बंद केल्याने कांबळे महिलेला फोन करुन मी बरे करतो,असे म्हणून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे बोलू लागला. मात्र त्यांनतर महिलेला जास्त त्रास होऊ
लागल्याने महिलेने कांबळे यास फोन करुन तुम्ही पूजा केली का मला जास्त त्रास होतोय, असे म्हटले असता कांबळे याने महिलेशी अश्लील बोलत तुला पूर्ण बरे करतो, असे सांगत शरीरसुखाची मागणी केली.घडलेल्या घटनेबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी भोंदूगिरी करणाऱ्या आदिनाथ विश्वनाथ
कांबळे रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.

No comments:

Post a Comment