बारामतीत डंपरखाली सापडून दोघांचा मृत्यू...
बारामती :- बारामती एम आय डी सी, पेन्सिल चौक येथील चौकामध्ये डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला.तर या अपघातात दुचाकी वरीलच एक युवक अपघातातून बचावला, भर चौकात हा अपघात झाला.या अपघातात प्रतीक विजय भोसले (वय 20) व निखिल सौताडे (वय 20) (दोघेही रा. दुधोडी, ता. कर्जत, जि. नगर)यांचा मृत्यू झाला. दुचाकी वरील संदेश कुंभार याने गाडी डंपरला धडकते आहे हे पाहिल्यावर गाडीवरून उडी मारल्यामुळे तो बचावला. त्याला कसलीच दुखापत झाली नाही.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निखिल सौताडे हा
भारतीय सैन्य दलात भरती झाला होता व त्याने ऑनलाईन मोबाईल मागवला होता. हा मोबाईल पार्सलने आला होता तो मोबाईल घेण्यासाठी तिन्ही मित्र मोटरसायकल वरून निघाले होते. त्याच वेळेस बारामती बाजू कडून आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या डंपरसमोरच दुचाकी आल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.मोटरसायकलवर असलेले तिघे एकमेकांचे मित्र होते.यामध्ये प्रतीक विजय भोसले हा विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. हे तिघे एकाच रूमवर
वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये प्रतीक भोसले व निखिल अवताडे यांच्या अंगावरून ट्रकचे चाक केल्यामुळे त्यांचा या अपघातात मृत्यू झाला.दोन्ही युवकांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर
दुःखाचा डोंगर कोसळला. निखिल सौताडे हा आपल्या आईला बारामतीत दवाखान्यात घेऊन आलेला होता व उद्या ते पुन्हा गावी परत जाणार होते. त्याचे नुकतेच लग्न ठरलेले होते, अशीही माहिती पुढे आली आहे.या अपघातानंतर अपघातातून बचावलेल्या संदेश कुंभार
याला देखील कमालीचा मानसिक धक्का बसला होता दोन्ही युवकांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाअसून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, तर या एमआयडीसी चौकात होत असलेली गर्दी व रस्त्याच्या कडेला असलेली वाहनांची पार्किंग यामुळे होणारी गर्दी त्रासदायक होत आहे यासाठी काही कारवाईचे ठोस पाऊलं उचलणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment