*रासपचे तानाजी शिंगाडे यांची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी वर्णी*
इंदापूर/प्रतिनिधी:-राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर तालुका संघटक यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ.महादेव जानकर यांच्या शिफारशी नुसार पुणे जिल्हाचे पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.
पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, मुख्य महसचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांच्या वतीने तानाजी शिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्करावेळी शेवते म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर तालुक्यामध्ये संघटमाक बांधणीचे काम उभा करण्यात शिंगाडे यांचे मोलाचे योगदान असून गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता हे अभियान तालुक्यामध्ये सक्षम पणे राबवण्याचे काम त्यांनी केले. याची पोचपावती म्हणून महादेव जानकरांनी एक सामान्य कुटुंबातील शेतकरी तरुणाला निस्वार्थ भावनेने पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देऊन उपेक्षिताला अपेक्षित ठिकाणी बसवण्याचे काम केले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासाला सार्थ ठरत सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे सत्कार स्वीकारताना तानाजी शिंगाडे यांनी सांगितले. यावेळी अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ, जामखेड तालुकाध्यक्ष डॉ.प्रकाश कारंडे, जामखेड युवक तालुकाध्यक्ष नंदू खरात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment