अनधिकृत होर्डिंगवर नगरपालिका प्रशासन कारवाई करण्याची राबवित आहे मोहीम.. बारामती:-बारामती शहरात अनधिकृत होर्डिंगवर नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंगवर करण्याची मोहीम हातात घेतली असून नगरपालिका प्रशासनाच्या सर्व्हेत १०७ होर्डिंग
अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. पहिल्या दिवशी सात होर्डिंग्स काढण्यात आले असून अनधिकृत होर्डिंग्स लावल्या प्रकरणी
नगरपालिका प्रशासन ठेकेदारांवर
कारवाई करणार असल्याने ठेकेदारांचे
धाबे दणाणले आहेत.नगरपालिकेची कोणतीही
परवानगी न घेता अनाधिकृतपणे शहरात होर्डिंग उभारले जात आहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडत आहेत.त्यामुळे अनाधिकृत होर्डिंगच्या बाबत नगरपालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अनधिकृत होर्डिंग साठी नगरपालिकेने यापूर्वी ठेकेदारांना नोटीस बजावले आहेत. नगरपालिकेचे नोटिसांकडे दुर्लक्ष करत ठेकेदारांनी अनधिकृतपणे होर्डिंग उभारले आहेत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे,आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,
सुनील धुमाळ यांच्यासह नगरपरिषद
आरोग्य विभागाची टीम कार्यरत होती. वादळी वाऱ्यामुळे मोरगाव रोड येथील होर्डिंग कोसळल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने कारवाईचावेग वाढवला आहे.असाच वेग वाढवत बारामती शहरातील व हद्दवाडीतील क्लासेस, अकेडमी, मॉल,बझार, शॉप, दुकाने,कापड दुकाने, मोबाईल दुकाने यांच्या समोर अवाढव्य बेकायदेशीर जाहिराती लावल्या आहे यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment