*गौण खनिजाची अनाधिकृतपणे खुल्या बाजारात विक्री, पुरावे देऊन देखील कार्यवाही होत नसल्याचे तक्रारी*
बारामती:- बारामती नगरपरिषद वाढीव हदीतील गांव मौजे जळोची याठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पिण्याच्या पाण्याच्या तलावा शेजारी बॅल्नसीग टॅन्क च्या खोदाई चे काम चालू आहे,सदरचे काम 'स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनी कोल्हापूर हे करीत असून सदरच्या खोदाईचे कामातून निघालेले गौण खनिज हे एका विशिष्ठ ठिकाणी साठवणूक करणे कामी नगरपरिषदेचे आदेश असताना सदर कंपनीचा मॅनेजर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हाईवा डंपर ड्रायव्हर लोकांना हाताशी धरून त्यांचेशी संगनमत करून या गौण खनिजाची खुल्या बाजारात अनधिकृतपणे विक्री करताना दिसत आहे,तसेच पाईपलाईनचे खोदाई चे काम घालुन दिलेल्या नियमा प्रमाणे खोदाईची खोली होताना दिसून येत नाही. तसेच ज्या ठिकाणी कठिण खडकाळ भाग आहे अशा ठिकाणी मुरूम बेडींग करून पाईप टाकावा असा नियम असून तो नियम धाब्यावर बसविला आहे,या सर्व गोष्टी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संबधीत अधीकारी यांना लेखी व तोंडी पञाद्वारे कळविले आसुन देखील संबधीत अधीकारी कार्यवाही करताना दिसत नाही,याचा अर्थ अधीकारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदरचा चाललेला सावळा गोंधळ काहीही केल्या थांबत नाही त्यामुळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अधीकारी सदर बाबींकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत आहेत, तरी या निवेदना द्वारे आपणास विनंती सदरचे काम सदरच्या कंपनी कडून काढुन घेण्यात यावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी लेखी निवेदनात दिला आहे. * बारामती मधील महत्वाचे मानले जाणारे हद्दवाडीतील जळोची तलाठी कार्यालय हद्दीत अनधिकृत मुरूम व वाळू साठे असतांना त्याच्यावर कारवाई होत नसून तलाठी कार्यालयात आसतात का?नाही हेच कळत नसल्याचे अनेक नागरीकांनी बोलून दाखविले असून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडलधिकारी याकडे लक्ष देतील का?हे पाहावे लागेल*
No comments:
Post a Comment