पीडित महिलेला गुंगीचे औषध देवुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर 12 लाखाची खंडणी उकळली..
पुणे:- महिलेचा गैरफायदा घेत अनेक महिलांना ब्लॅक मेल करून अत्याचार करण्यात येत असल्याचे अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहे, नुकतेच महिलेस गुंगीचे औषध देवुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास तसेच महिलेकडून 12 लाख रूपये खंडणी स्वरूपात घेणाऱ्यास चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे.विरेश यशवंत म्हस्के (40, रा. गणेशनगर, वडगाव शेरी,
पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत
अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी 2019 मध्ये
आरोपी विरेश म्हस्केने पिडीत महिलेला
नाष्टयामधून गुंगीचे औषध देवुन तिच्यावर
लैंगिक अत्याचार केले होते. पिडीत महिलेस
मुलगी झाल्यानंतर तिला वडिलांचे नाव देण्यासाठी आरोपीने पिडीतेकडे 20 लाख
रूपयाच्या खंडणी मागणी केली. 12 लाख
रूपयाचे लोन पिडीत महिलेच्या नावावर घेवुन
ते पैसे आरोपीने स्वतःच्या नावावर ट्रान्सफर
करून घेतले होते. पिडीतेने चंदननगर पोलिस
ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती.चंदननगर पोलिस आरोपी विरेश म्हस्केचा शोध घेत होते. पोलिस अंमलदार शिवाजी धांडे यांना आणि नामदेव गडदरे यांना तांत्रिक तसेच गोपनीय विश्लेषणाव्दारे बातमीदारामार्फत आरोपी हा खांदवे नगर परिसरात लपुन बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन आरोपीला अटक केली आहे. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिसआयुक्त संजय पाटील यांच्या सुचनेप्रमाणे आणि वरिष्ठ
पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे , पोलिस निरीक्षक
(गुन्हे) जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे, पोलिस अंमलदार सुहास निगडे,सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, शिवाजी धांडे, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे,सुभाष आव्हाड, विकास कदम आणि गणेश हांडगर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक संगिता काळे करीत आहेत.
No comments:
Post a Comment