कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची 15 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची 15 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी...

कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची 15 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी...
 मुंबई :- बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधित  मुंबईत ईडीकडून छापेमारी  सुरु आहे. तब्बल 15
हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु
आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा
प्रकरणात  ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संदर्भात
ईडीकडून छापेमारी  सुरु आहे.पालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ एक छापे  टाकण्यात आले. सकाळी सुरुवातीला संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. पाटकर यांच्याशी
संबंधित 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले
आहेत. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे  यांचे निकटवर्तीयांवरही छापेमारी सुरु आहे.
ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या निवासस्थानी देखील ईडीने छापा टाकला.
याचबरोबर कोरोना काळात मुंबई महापालिकेचे
तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडेही छापा टाकण्यात आला.मुंबईत 15 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी सुरु आहे.लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी सुजीत पाटकर यांची आहे.
त्यात डॉ. हेमंत रामशरण गुप्ता,संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे  हे भागीदार
आहेत. त्यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजी नगर पुणे जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट हे फसवणूक करुन मिळवल्याचा
आरोप त्यांच्यावर करण्यात आला असल्याचे माहिती कळाले.

No comments:

Post a Comment