पुणे :- अॅन्टी करप्शनच्या पथकाने पोलिस लाच प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर येरवडा पोलिस स्टेशनमधून गायब झालेल्या त्या दोन पोलिस हवालदारांच्या मागावर अॅन्टी करप्शनची पथके असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, 20 हजाराच्या लाचेची मागणी करून 13 हजाराची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने पोलिस हवालदार राजेंद्र रामकृष्ण दिक्षीत यांना रंगेहाथ पकडले आणि
त्यांना अटक केली . मात्र, त्याचे सहकारी पोलिस हवालदार जयराम नारायण सावळकर आणि पोलिस हवालदार विनायक उल्गा मुधोळकर हे गायब झाले आहेत.अॅन्टी करप्शनच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री येरवडा पोलिस स्टेशन येथे लाच घेताना राजेंद्र दिक्षीत यांना रंगेहाथ
पकडले होते. त्यांना अटक केल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पोलिस हवालदार दिक्षीत यांना दि. 16 जून 2023 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिस
हवालदार जयराम सावलकर आणि पोलिस हवालदार विनायक मुधोळकर हे ट्रॅप झाल्यापासून गायब झाल्याने त्यांचा अॅन्टी करप्शनच्या पथकांकडून शोध घेतला जात त्यांचा अॅन्टी करप्शनच्या पथकांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांनी दिली आहे. पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे,अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक भारत साळुंखे,पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर ,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुकुंद आयाचित, पोलिस अंमलदार भूषण ठाकूर आणि पोलिस अंमलदार पांडुरंग माळी यांच्या पथकाने पोलिस हवालदार दक्षित यांना 13 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांनी लाचेची मागणी केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment