3,73,860/-रुपये किमतीचा गुटखा,तंबाखूजन्य पदार्थावर छापा मारून केले जप्त.. कोंढवा:-दिनांक.8/6/2023 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील स्टाफ कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अमली पदार्थ गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माहिती काढण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार चेतन गायकवाड यांना बातमी मिळाली, इसम नामे रिजवान हनीफ अन्सारी वय 24वर्ष राहणार गल्ली नंबर 9 भारत हार्डवेअर जवळ शिवनेरी नगर कोंढवा पुणे हा गल्ली नंबर 23 शिवनेरी नगर कोंढवा पुणे या ठिकाणी प्रतिबंधित गुटखा विक्री करत असल्याची बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून, छापा कारवाई करून पोलीस अंमलदार व पो उप निरी शुभांगी नरके यांचे मदतीने त्याला ताब्यात घेऊन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे जवळ किंमत रुपये 3,73,860/- किमतीचा गुटखा तंबाखूजन्य पदार्थ,तसेच एक मोबाईल फोन असा ऐवज मिळून आल्याने तो जप्त करून त्याचे विरुद्ध कोंढवा पोलीस ठाणे येथे भादवि कलम 328,188,272,273, 34 सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम कलम ७(२) व २०(२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 2006 चे कलम २६(२)(i)(iv), 59 प्रमाणे कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा.श्री रामनाथ पोकळे अप्पर पो आयुक्त , गुन्हे .मा श्री अमोल झेंडे पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर , मा श्री सतीश गोवेकर सहा पो आयुक्त गुन्हे 2 यांचे मार्गदर्शनाखाली पो निरीक्षक विनायक गायकवाड ,पो उप निरीक्षक एस डी नरके,पो हवा देशपांडे, पो हवा गायकवाड , पो हवा जाधव, पो हवा रोकडे, पो ना शेळके,पो शि मांढरे, पो शि बास्टेवाड पो शी अझीम शेख यांनी केली आहे.
Post Top Ad
Thursday, June 8, 2023
Home
कोंढवा
ताज्या घडामोडी
3,73,860/-रुपये किमतीचा गुटखा,तंबाखूजन्य पदार्थावर छापा मारून केले जप्त..
3,73,860/-रुपये किमतीचा गुटखा,तंबाखूजन्य पदार्थावर छापा मारून केले जप्त..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment