धक्कादायक..डॉक्टरने आपल्या पत्नी आणि दोन मुलांचा खून करुन स्वतः केली आत्महत्या.. दौंड:- पुणे जिल्ह्यातील डॉक्टरची पत्नी मुलांसह आत्महत्या, दोन मुलांचे मृतदेह आढळले विहिरीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे.डॉक्टरने आपल्या पत्नी आणि दोन मुलांचा खून करुन स्वतः आत्महत्या केली. डॉक्टरने पत्नीचा खून करुन दोन लहान मुलांना विहिरीत टाकून आपले आयुष्य संपवले. ही घटना वरवंड येथील गंगासागर पार्कमध्ये रुम नंबर 201 मध्ये
राहत्या घरी घडली आहे. या घटनेमुळे दौड तालुक्यासह पुणे जिल्हा हादरुन गेला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42 ) आणि पत्नी पल्लवी दिवेकर(वय-35 ) यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरात सापडले तर मुलगा अद्वित अतुल दिवेकर घरात सापडले तर मुलगा अद्वित अतुल दिवेकर (वय-11 ) आणि मुलगी वेंदातिका अतुल दिवेकर (वय-7 ) यांचे मृतदेह
विहिरीत आढळले आहेत. विहीर जवळपास
10 परस इतकी खोल असून 45 फूट एवढे
पाणी असल्याने मुले वर काढण्यात मोठी
अडचण येत आहे.या घटनेमुळे दौंड तालुक्यासह वरवंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावावर
शोककळा पसरली आहे.डॉ. अतुल दिवेकर हे व्यावसायाने गुरांचे डॉक्टर असून त्यांची पत्नी एका शाळेत शिक्षिका असल्याची माहिती समोर
आली आहे. पोलिसांना घटनास्थळावरुन सुसाईड नोट मिळाली आहे. पुढील तपास पोलीस करीत
आहेत.
No comments:
Post a Comment