परळी वैजनाथ:-वडिलांच्या मृत्यूस पोलिस जबाबदार असल्याचा आरोपा मागे मिळालेली माहिती नुसार शहरातील एका चोरीच्या प्रकरणात
मंगळवारी (ता.१३) सायंकाळी पाचच्या सुमारास
जरीन खान व समीर खान या बाप-लेकाला शहर
पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती.
रात्री दहाच्या सुमारास जरीन खान याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूस पोलिस जबाबदार असल्याचा आरोप मुलगा समीर खान याने केला. रात्री मोठा जमाव ठाण्यासमोर जमला होता. पोलिस प्रशासनातील अधिकारी शहरात तळ ठोकून आहेत.शहरात सहा जूनला चार लाख ९० हजार रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद
करण्यात आला. याच प्रकरणात संशयित म्हणून जरीन खान (वय ४८) व समीर खान (वय २६, दोघे रा.बरकतनगर, परळी) यांना शहर पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली.पोलिस कोठडीत जरीन खान यांचा रात्री मृत्यू झाला.
पोलिसांनी जरीन खान यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वडिलांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप समीर
खानने केल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.काल मध्यरात्री पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव एकवटला
होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी दाखल होत स्थिती नियंत्रणात आणली. जरीन खान यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झालेला नाही तर त्याला फिट्स येत
होत्या, त्यातून ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांचे मत आहे.
No comments:
Post a Comment