बीड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेले लिखान, सामाजिक भान दाखवणारे आहे. तर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून वृत्तपत्रांच्या अर्थकारणावर आणि पत्रकारांच्या समस्यांवर घेतलेली भूमिका वृत्तपत्र क्षेत्राला दिशा देणारी असल्याने ही भूमिका सरकारने समजून घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला पुरस्कार हा मुंडेंच्या प्रयत्नांचा सन्मान आहे. अशा शब्दात भाजपचे प्रदेश महामंत्री विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी कौतुक केले.
बीड येथे रविवार दि. 18 जून रोजी भाजप प्रदेश महामंत्री विधीमंडळ सदस्य आमदार श्रीकांत भारतीय यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. लोकमत मिडीया ग्रुपचा यावर्षीचा आंतराष्ट्रीयस्तरावरील एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम अवॉर्ड मिळाल्याबद्दल वसंत मुंडे यांचा सत्कार करुन भारतीय यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संपादक संतोष मानूरकर, पत्रकार संघाचे बाबा देशमाने, वैभव स्वामी, गंगाधर काळकुटे आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना भारतीय यांनी वसंत मुंडे यांच्या वीस वर्षाच्या पत्रकारीतेतील कामाचे कौतुक करुन पत्रकार संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र क्षेत्राला दिशा देणारी भूमिका घेतल्याबद्दल कौतुक केले. सामान्यांचे प्रश्न मांडताना प्रसारमाध्यमात काम करणार्यांचेही प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा आंतराराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला. ही बाब मराठवाड्यासाठी गौरवाची आहे.
वृत्तपत्रांचे अर्थकारण सरकारने समजून घ्यावे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मागच्या तीन वर्षात वृत्तपत्रांच्या अर्थकारणावर राज्यभरात विभागीय सात अधिवेशने, संपादकांची गोलमेज परिषद घेऊन वृत्तपत्रांचे अर्थकारण मांडले आहे. सखोल अभ्यास करुन वृत्तपत्रांचे सध्याचे वास्तव आणि यावर भविष्यातील पर्याय दाखवण्याचा प्रयत्न मुंडे यांनी केला आहे. हे अर्थकारण सरकारने समजून घेणे गरजेचे आहे असे मत आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment