खळबळजनक..बारामतीत पोलिसांसह व सराफाविरुद्ध बलात्कार ,फसवणुक व अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 25, 2023

खळबळजनक..बारामतीत पोलिसांसह व सराफाविरुद्ध बलात्कार ,फसवणुक व अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल..

खळबळजनक..बारामतीत पोलिसांसह व
 सराफाविरुद्ध बलात्कार ,फसवणुक व अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल..
बारामती :-महिलांची वाढत्या अत्याचाराच्या घटना काही खऱ्या तर काही खोट्या तर काही हेतुपुरस्सर दाखल झाल्याचे अनेक वेळा पाहिल्या व ऐकल्या असतील अशीच घटना बारामतीत घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली एका महिलेची फसवणूक करत पोलिस कर्मचारी व अन्य एकाने तिच्यावर बलात्कार केला. या
प्रकरणी बारामतीतील एकूण सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणांमध्ये दोन पोलीस कर्मचारी, सराफ व त्याचा मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल
झाला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी शिवाजी राजाराम निकम, भरत ओसवाल, कविता शिवाजी निकम, जीत
ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम, समीर शेख व दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील शिवाजी
निकम हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात तर श्रीकांत निकम हे अकलूज पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत. यामध्ये शिवाजी निकम, भरत ओसवाल यांच्याविरुद्ध बलात्काराचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर सर्वांविरुद्ध फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.80 तोळे सोने घेऊन त्या बदल्यात फक्त वीस लाख रुपये देऊन उर्वरित सोन्याचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली,तसेच सोने परत देतो म्हणून शक्ती प्लाझा खाटीक गल्ली
बारामती येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला व जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली, तसेच कविता शिवाजी निकम,जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम व समीर शेख यांनी
फिर्यादीस गरुड बाग येथे बोलावून जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली, अशा स्वरूपाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे
याबाबत पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment