राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 26, 2023

राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी..

राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी.. 
बारामती दि.२६: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे लोककल्याणकारी राजा,आरक्षणाचे जनक,राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज हे समतेचे प्रणेते असून त्यांनी आपल्या संस्थांना मध्ये वंचित,पीडित घटकाला ५०% आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महान काम केले आहे.त्याचसबोत शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना देखील यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे,ॲड.विनोद जावळे,शुभम अहिवळे यांनी उजाळा दिला.या प्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुशिल अहिवळे,चारुदत्त काळे,विजय साबळे,प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन जयंती महोत्सव समितीचे सदस्य माजी नगरसेवक गणेश सोनवणे,बबलू जगताप,गौतम शिंदे,सोमनाथ रणदिवे,चंद्रकांत भोसले,चेतन साबळे,कैलास शिंदे,परीक्षित चव्हाण,विश्वास लोंढे,निलेश खरात यांनी केले होते.

No comments:

Post a Comment