चौकात वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 10, 2023

चौकात वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात...

चौकात वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात...
बारामती:-बारामती मध्ये सध्या वाढदिवस साजरा करताना भान ठेवणं गरजेचं आहे कुणालाही आपल्या मुळे त्रास होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे, नुकताच भर दुपारी दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे. याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चेल्या चपात्यांनी सातव चौकात केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला. त्या ठिकाणी अनेक मुले जमा झाल्याने लोकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तात्काळ पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी झडप घालून1.राहुल राजेंद्र मदने वर्ष राहणार प्रगती नगर बारामती जिल्हा पुणे
2.विकास  नानासो चंदनशिवे वय वर्ष राहणार मळद तालुका बारामती जिल्हा पुणे,3. अक्षय भीमराव कांबळे वय 26 वर्ष रा आमराई बस स्टॅन्ड समोर बारामती जिल्हा पुणे,4. सागर रमेश आटोळे 29 रा कसबा चांदणी चौक बारामती जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले. बाकी शूरवीर समर्थक रस्ता मिळेल तिकडे पळून गेले. ज्याचा वाढदिवस होता तोही पसार झाला. पोलिसांनी वरील सर्वांच्यावर भादवि कलम 143 147 149 504 506 व क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलेले आहे.त्यामुळे भर रस्त्यात केक कापणार्यांनी यापुढे पोलिसांचे वरील कलमाप्रमाणे चे प्रमाणपत्र सुद्धा घेण्यास तयार राहावे. विशेष करून कॉलेजियन्स लोकांनी याबाबत जास्त खबरदारी घ्या . एकदा गुन्ह्याचे प्रमाणपत्र  भेटले. मग त्यांच्या गुणवत्तेच्या इतर प्रमाणपत्राची किंमत झिरो होते. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

No comments:

Post a Comment