खळबळजनक..कोयत्याने
सपासप वार करून एकाचा खून..
पिंपरी:- कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना
रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.मावळ तालुक्यातील गहुंजे येथे युवकाचा यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे,मावळ तालुक्यातील गहुंजे येथे युवक सूरज काळभोर असे खून झालेल्याचे नाव आहे. सूरज हे गहुंजे येथे त्यांच्या सासरवाडीमध्ये गेले होते. संतोष बोडके यांच्या मुलीशी सूरज यांचा सुमारे दीड महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर ते सासरवाडीत गेले होते. रविवारी सकाळी ते शेतात फिरायला गेले. तीन-चार मारेकऱ्यांनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. सूरज काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडले.घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सूरज यांचा खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सदरील घटना ही लूटमार करण्याच्या उद्देशाने झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. सूरज काळभोर हे आकुर्डी स्टार हॉस्पिटल मागे राहायला होते.त्यांची आई महानगरपालिकेच्या दवाखान्यात कामाला आहे तर ते पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरी करीत होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment