बारामती दिनांक १५ जून (प्रतिनिधी) :- कधी कधी अचानक आयुष्यात काही गोष्टी समोर येतात आणि त्यातून काहीतरी समाजकारण घडतं हे मनाला खूप समाधान देऊन जात. असेच सहज वॉकिंग करत असताना रस्त्याच्या कडेने सामान घेऊन विकणारी बसलेली बघत होते. तिच्यासोबत काही मुलं खेळत असायचे रोज येता जाता त्यांना बघायची, एकदा ठरवलं की ती मुलं शाळेत जातात की नाही हे विचारावा आणि सहज विचारले तर समजले की शाळेची फी एवढी असल्यामुळे आणि पैशाअभावी शिक्षण थांबले आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचे आत्ता असे तर पुढे त्यांचं भवितव्य काय हा विचार मनाला खंत करणारा आहे. अश्याच खूप गरीब परिस्थितीत शिक्षण थांबलेले आहे. त्या मुलांना शिक्षण साठी दत्तक घेऊन त्यांचे आयुष्याचे मधुबन करावे या अपेक्षेने आभाळमाया ग्रुप यांनी त्या मुलांची विचारपूस करून त्यांची कागदपत्र जमा करून त्यांचे ऍडमिशन घेतले आणि त्यांना शालेय किट, युनिफॉर्म, पुस्तके, टिफिन, वॉटर बॉटल असे सर्व शालेय साहित्य देऊन एडमिशन घेतले.
आभाळमाया ग्रुप अनेक मुलांच्या शिक्षणाचा भार उचलून समाजात सामाजिक कार्य करत असते. अश्या त्यांच्या या कार्याला समाजानेही काही हातभार लावावा अशी इच्छा आभाळ माया ग्रुपच्या अध्यक्षा सौ अल्पा ताई भंडारी यांनी व्यक्त केली. तसेच समाजासाठी नेहमी तत्पर असणारे बारामती शहरचे माननीय पोलीस निरीक्षक अधिकारी श्री सुनील महाडिक सर यांच्या हस्ते शालेय किट देण्यात आले.
तसेच श्री व्ही. के. सोनवणे अधिक्षक महात्मा गांधी बालक मंदिर, श्री तानाजी वाघ अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सौ. उषा अनिल आढाव मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग, सौ राजश्री लंकेश्वर मुख्याध्यापिका बालवाडी विभाग, शुभांगी कोरे मॅडम प्राथमिक विभाग, काळे सर, मुक्ता कामठे मॅडम, नयन देशपांडे मॅडम बालवाडी विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभाळमाया ग्रुपच्या अध्यक्षा सौ अल्पा नितीन भंडारी, सौ अर्चना भंडारी, सौ अंजली देसाई, सौ सायली मोदी, सौ वैशाली मुथा, सौ शितल मुथा, सौ लता ओसवाल, सौ कल्पना ओसवाल आदी उपस्थितीत होते
No comments:
Post a Comment