पुणे:-नुकताच भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली होती. सदाशिव पेठेत झालेल्या या हल्ल्यात तरुणी जखमी झाली. मात्र वेळीच तेथील तरुणांनी प्रसंगवधान दाखवत जीवाची पर्वा न करता त्या मुलीचे प्राण वाचवले. शंतनु जाधव असे आरोपीचे नाव असून
तर लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील अशी मुलीला वाचवणाऱ्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त
रितेशकुमार यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महिला पोलिसांची २५ दामिनी पथके तयार करण्यात येणार असून हे पथके रोज शहरात गस्त घालणार आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी सदाशिव पेठेपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पेरुगेट पोलीस चौकीतील पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलीस
हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ज्यावेळी सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. त्यावेळी पेरुगेट पोलीस चौकीत एकही कर्मचारी
उपस्थित नव्हता. तर बीट मार्शल यांनी देखील घटनास्थळी यायला 20 मिनिटं लावली. यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांच्याकडून
देण्यात आली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारींच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यातही मुलींवर अत्याचार,मुलींवरील महिलांवरील हल्ले यांसारख्या सातत्याने घडत आहेत. त्यामुळे शहरातील मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा
प्रश्न ऐरणीवर आला आहे.
No comments:
Post a Comment