बारामतीत सामाजिक कार्यकर्ते यांनी नांदेड येथील घटनेचा निषेध करीत प्रांताधिकारी यांना दिले निवेदन..
बारामती : दिनांक 6 जून 2023 रोजी. नांदेड या ठिकाणी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या युवकाचा जातीयवादी गावगुंडांनी निर्घृण खून केला आहे. या प्रकरणामध्ये संबंध महाराष्ट्र मध्ये संतापाची लाट आहे.सदर घटनेचा निषेध करीत बारामती शहरातील अनिकेत मोहिते, भास्कर दामोदरे, सुमित साबळे, गणेश भाईजी सोनावणे, विजय जगताप, दादा कांबळे,निखिल खरात,अभिलाष बनसोडे, नितीन थोरात,सर्व युवक सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील नेते, यांनी सर्वांनी एकत्र येऊन बारामती प्रांत अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे पत्र निवेदनाद्वारे दिले असून.. या घटनेमध्ये तात्काळ न्याय नाही मिळाल्यास संबंध महाराष्ट्र मध्ये मोठे जन आंदोलन उभे राहील असा इशारा देखील दिला.
No comments:
Post a Comment