बारामती:-माळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पणदरे (ता. बारामती) येथील
ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते(आरटीआय कार्यकर्ते,संघर्ष का साथी) विक्रम भरत कोकरे (वय २८ ) यांच्यावर पूर्ववैमनश्यातून सहा आरोपींनी लोखंडी रोडच्या सहय्याने खुनी हल्ला केला.जखमी विक्रम यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे.त्यांची प्रकृती सध्याला स्थिर असून त्यांच्यावर बारामती
येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवार(ता. २१) रोजी रात्री साडेआकरा वाजल्याच्या सुमारास वरील घटना घडली. या घटनेचे गंभीर पडसाद गुरूवारी पणदरे गावात पडल्याचे दिसून आले.येथील गावकऱ्यांनी व्यापारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवत वरील
घटनेचा निषेध केला. पोलिसांनीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचे दिसून आले.जखमी विक्रम कोकरे यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्यातील आरोपीवर कडक कारवाई होण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी पणदरे पोलिस चौकीसमोर सकाळच्यावेळी ठिय्या मांडला
होता, तर काही कार्यकर्त्यांनी घटनेच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका यावेळी मांडली.दरम्यान, जखमी विक्रम कोकरे यांनी ६ संशयित
हल्लेखोरांविरुद्ध, तसेच या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या १२ लोकांच्याविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये मुख्य संशयित आरोपींमध्ये राजेंद्र शिवाजी कोकरे, कुणाल चेतन कुंभार, तुषार हनुमंत
कोकरे, धैर्यशिल संभाजी कोकरे, चेतन विठ्ठल कुंभार,स्वप्निल चेतन कुंभार (सर्व रा. पणदरे) यांचा समावेश आहे. तसेच या खूनी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेले संशयितांमध्ये तानाजी तात्यासाहेब कोकरे, अमित शिवाजी कोकरे, कुलभूषण हनुमंत कोकरे, तेजस संजय कोकरे,
पुथ्वीराज तानाजी कोकरे, सोमनाथ भारत माने, हर्षल चंद्रकांत जाधव, राजेंद्र लालासाहेब मदने, विशाल दत्तात्रेय कोकरे, योगेश गवळी, भारत कोकरे, गणेश नाना खोमणे (सर्व रा.पणदरे) यांचाही समावेश असल्याचे जखमी विक्रम
यांनी फिर्यादिमध्ये नमूद केले आहे.म्हसोबावाडी येथील गायरान व गावठाण जमिनीवरील
अतिक्रमण खाली करावे म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करीत असल्याने, तसेच खामगळवाडी येथील खडी क्रशर बंद करून शासनाला महसूल मिळवून दिला, याचा राग मनात धरीत वरील लोकांनी कट कारस्थान करीत मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशीही लेखी तक्रार विक्रम यांनी फिर्यादिमध्ये नमूद केली.याशिवाय खिशातील पाणी व्यवसायाचे २५ हजार सहाशे
६० रुपये काढून घेतल्याचाही आरोप संबंधितांविरुद्ध विक्रम यांनी पोलिसात केला आहे. सदरची तक्रार विचारात घेवून पोलिसांनी एकूण १८ संशयित आरोपींविरुद्ध जीवे
मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, कट कारस्थान करणे, सहमतीशिवाय पैसे काढून घेणे,शिवीगाळ व दमदाटी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला.तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधिकारी देविदास
साळवे यांनी सदर गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेत मुख्य आरोपी चेतन विठ्ठल कुंभार, कुणाल चेतन कुंभार, स्वप्निल चेतन कुंभार यांना तातडीने अटक केली. तसेच संशयित फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना
केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
No comments:
Post a Comment