धक्कादायक..तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने युवकाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 6, 2023

धक्कादायक..तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने युवकाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड...

धक्कादायक..तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने युवकाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड...
लातूर :- अतिशय संतापजनक घटना समोर आली याबाबत समजलेली माहिती अशी की, मानवतेला काळीमा फासणारी ही घटना घडली गिरीरत्न तबकाले या मातंग गरीब बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात काठीने मारहाण केली. तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेला नेहमी प्रमाणे दलित असलेल्या पीडिताची तक्रार घेतली नाही उलट बाँडवर जखमी पीडिताचा जबाब घेऊन प्रकरण दडपून टाकले. हाताला गंभीर मार लागल्यामुळे तो हॉस्पिटलला गेला, पोलिसांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे आरोपीचे बळ वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिरत्न तबकाले याच्या घरी त्याने सकाळी 6 वाजताच हल्ला चडवला.हल्ला अतिशय क्रूरपणे केला, आरोपी अन् त्याचा भाचा या दोघांनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला या हल्ल्यात मातंग बांधव मृत्यूमुखी पडला. दलित आहे आमचं काय करणार या मानसिकतेतून त्याची आर्थिक लुटमार केली आणि मस्तावलेल्याने जणू पोलीस यंत्रणा खिश्यात घातली या मानसिकतेतून ही हत्या केली असल्याचे कळतंय,राज्यात दलित सुरक्षित नाहीत, नांदेडची घटना ताजी असताना ही अतिशय क्रूर घटना समोर आली जाहीर निषेध करत असून राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे की मातंग समाजाचे हे हत्याकांड तुम्ही गंभीर घेणार आहेत की नाही?असा सवाल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment