बारामतीत अहिल्यादेवी जन्मोत्सवाचे शनिवारी आयोजन;पहिल्यादाचं बारामतीच्या जयंती कार्यक्रमाला भाजपच्या बड्या नेत्यांची हजेरी...
बारामती:- बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंतीच्या आयोजन करण्यात आले आहे. हिंदूधर्म रक्षिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच या कार्यक्रमासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची हजेरी लागणार आहे. अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
शनिवार दि.24जून रोजी भिगवण चौक येथून दुपारी तीन वाजता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणारं आहे. ही मिरवणूक भिगवण चौक, अहिल्यादेवी चौक, गुणवडी चौकातून व्यापारपेठेतून स्टेशन रोड वरून शारदा प्रांगन येथे येणारं आहे. शारदा प्रांगणवर संध्याकाळी सहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरं बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आमदार राम शिंदे, आमदार राहुल कुल, आमदार दत्तात्रय भरणे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्तित राहणार आहेत.
या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोग वं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणारं आहे.
चौकट : 31मे रोजी चौडी येथे झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमात राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर तर बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल ग्रामविकास वं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांना "अहिल्यारत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारं आहे. अशी माहिती जयंती उत्सवाचे आयोजक अभिजीत देवकाते यांनी दिली...
No comments:
Post a Comment