श्रीगोंदा: - माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर परस्पर कर्ज काढून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची मिळालेल्या माहितीनुसार कर्ज प्रकरणात जामीनदार होण्यासाठी
दिलेल्या कागदपत्रांचा वापर करून फायनान्स
कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने परस्पर कर्ज
काढल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे, त्यांचे पती मच्छिंद्र शिंदे यांच्यासह सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर साहेबराव लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.2011 मध्ये आरोपी मच्छिंद्र शिंदे यांच्या पोकलेनच्या कर्ज प्रकरणाला जामीनदार होण्यासाठी फिर्यादी लोखंडे यांची
आधार, मतदानासह अन्य कागदपत्रे घेतली होती. मात्र,काही तांत्रिक कारणास्तव लोखंडे यांना जामीन घेण्यात आले नव्हते. त्यामुळे लोखंडे यांनी वेळोवेळी शिंदे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करूनही त्यांनी ती दिली नाहीत.
सन 2018मध्ये फिर्यादी लोखंडे हे वाहनकर्ज घेण्यासाठी एका वित्तपुरवठा कंपनीकडे गेले असता त्यांच्या नावावरील कर्ज थकीत असल्याने त्यांना कर्ज देता येणार नाही, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात फिर्यादी लोखंडे यांनी स्वतः
कोणतेही कर्ज घेतलेले नव्हते. त्यामुळे अधिक माहिती काढली असता माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे आणि मच्छिंद्र शिंदे यांच्या कर्ज प्रकरणात फिर्यादी लोखंडे हे जामीनदार असल्याचे उघड झाले. बोगस थकीत कर्ज प्रकरणाची रक्कम पावणेदोन कोटींच्या घरात पोहोचली आहे.लोखंडे यांच्या फिर्यादीवरून सुनीता शिंदे, मच्छिंद्र शिंदे,
अभिषेक पालवे, तत्कालीन शाखाधिकारी, सचिन दत्तात्रय पवार, दिनेश विजय बिहाणी, मुरलीधर पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांचे पती मच्छिंद्र शिंदे यांना पोलिसांनी अटक केली.
No comments:
Post a Comment