पीएसआयने 15 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनकडून कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 6, 2023

पीएसआयने 15 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनकडून कारवाई..

पीएसआयने 15 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनकडून कारवाई..
नाशिक:- लाच खोरीचे प्रमाण वाढत असताना नुकताच माहिती पुढे आली,दाखल गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी सुरूवातीला 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रूपयाच्या लाचेची
मागणी केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर अॅन्टी करप्शनने गुन्हा दाखल केला आहे. गणपत महादू काकड, नेमणुक - नाशिक
रोड पोलिस स्टेशन. रा. 8, कृष्ण अपार्टमेंट,
गजपंथ अपार्टमेंट, दिंडोरी रोड, म्हसरूळ,
नाशिक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. ते नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी
की, तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांच्याविरूध्द
नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
आहे. दाखल गुन्हयाच्या तपासात मदत
करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक गणपत
काकड यांनी दि. 5 जुलै 2023 रोजी तक्रारदार
यांच्याकडे 25 हजाराच्या लाचेची मागणी
केली. तडजोडीअंती 15 हजार रूपये लाच
घेण्याचे ठरले. तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान,त्यामध्ये पीएसआय गणपत काकड हे 15 हजार रूपयाची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अॅन्टी करप्शनकडून काकड
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठाघारगे-वालावलकर,अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गायत्री जाधव,पोलिस हवालदार बास्किर, पोलिस नाईक प्रकाश महाजन आणि महिला पोलिस नाईक ज्योती शार्दूल यांनी ही कामगिरी केली आहे.पुढील कारवाई सुरू असल्याचं अॅन्टी करप्शनकडून सांगण्यात आलं
आहे.

No comments:

Post a Comment