बापरे.. पोलिसावर बलात्कारासह अँट्रोसिटीचा व फसवणुकीचा गुन्हा ! 2 पोलिस,महिलेसह 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल...
पुणे:- बलात्कार व फसवणूक या घटना वाढत असताना त्यात आणखी भर पडल्याचे दिसत आहे नुकताच पुणे शहर पोलिस दलाच्या
गुन्हे शाखेतील एका पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पोलिसासह दुसऱ्या एका पोलिसावर, महिलेवर आणि 2 अनोळखी व्यक्तींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 24 वर्षीय पिडीतेने तक्रार दिली आहे. पोलिस अंमलदार कादीर कलंदर शेख आणि पोलिस अंमलदार समीर पटेल, 2 अनोळखी व्यक्ती व एका अनोळखी महिलेविरूध्द भादंवि कलम 420, 376,392, 323, 504, 506, 34
तसेच अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार
प्रतिबंधक) अधिनियम सन 1989 चे कलम अधिनियम सन 1989 चे कलम 3 (1) (12) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बी.टी. कवडे रोडवरील श्रीनाथ
कॉम्प्लेक्स आणि आंबेडकर चौकातील डायमंड
क्वीन हॉटेल समोर घडली आहे. सुमारे 3
वर्षापुर्वीपासुन ते दि. 1 जुलै 2023 दरम्यान हा
गुन्हा घडला आहे. सदरील गुन्हा लष्कर पोलिस स्टेशन येथुन सीसीटीएनएस प्रणातीत प्राप्त झाल्याने मंढवा पोलिस स्टेशनमध्ये स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिला या अनुसूचित जातीतील आहेत.त्याबाबत आरोपी कादीर कलंदर शेखला माहित असताना देखील त्याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले. वेळावेळी आळंदी येथे जावून लग्न करण्याचे बहाणे केले. प्रत्येक वेळी काही ना काही कारण देवून लग्न करण्यास टाळाटाळ केली.लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर कादीर कलंदर शेखने पिडीत महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. दि. 1 जून 2023 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान आंबेडकर चौकातील हॉटेल डायमंड क्वीन येथे आरोपी कादीर शेख, समीर पटेल आणि इतराना पिडीत महिलेला मारहाण केली. कादीर शेखने त्यांचा मोबाईल हिसकावून नेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.
No comments:
Post a Comment