बारामतीत दाखल असलेल्या गुन्ह्यातील, 30 कोटींची खंडणी महादेव जानकरांकडे मागितल्याच्या आरोपातील मुख्यसूत्रधाराला हायकोर्टाकडून जामीन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 16, 2023

बारामतीत दाखल असलेल्या गुन्ह्यातील, 30 कोटींची खंडणी महादेव जानकरांकडे मागितल्याच्या आरोपातील मुख्यसूत्रधाराला हायकोर्टाकडून जामीन..

बारामतीत दाखल असलेल्या गुन्ह्यातील, 30 कोटींची खंडणी महादेव जानकरांकडे मागितल्याच्या आरोपातील मुख्यसूत्रधाराला हायकोर्टाकडून जामीन..                                 मुंबई:- राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे 30 कोटीची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली होती. हे सर्व जण रासपचे माजी कार्यकर्ते असून त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षात प्रवेश केला होता.जानकर यांच्याकडे डॉ.इंद्रकुमार भिसे, सचिन पडळकर,
दत्ता खरे, विकास अदगल आणि तात्यासो कारंडे यांनी खंडणी मागितली होती. यासंदर्भात बारामती शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करत त्यांना अटक केली. या पाच जणांनी 4 मे रोजी आणि त्यानंतर 9 मे 2019
रोजी दुसऱ्यांना खंडणी मागितली होती. हे सर्वजण माळसिरस आणि अकलूजमधील असल्याचे समजते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर बदनामी करणार या प्रकरणावरून त्यांनी खंडणी मागितल्याचे समजले होते याप्रकरणी नुकताच मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे माजी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडे 30 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराला अखेर चार वर्षांनंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपी डॉ. इंद्रकुमार भिसेला 25 हजारांच्या वैयक्तिक
जातमुचलक्यावर सोडून देण्याचे आदेश न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांनी मंगळवारी दिले.महादेव जानकर यांच्याकडून 30 कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कथित गुह्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने डॉ. इंद्रकुमार भिसेसह सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या
कारंडे, विकास अलदर या पाच आरोपींना बारामतीमधून अटक केली होती. यातील अर्जदार डॉ. भिसे हा मागील चारहून अधिक वर्षे तुरुंगात आहे. त्याच्याविरोधातील खटलाही सुरू झालेला नाही याकडे भिसेच्या वतीने अॅड.सत्यम निंबाळकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच
सहआरोपी सचिन पडळकरच्या कथित गुन्हेगारी टोळीशी भिसेचा काहीही संबंध नाही. भिसेविरुद्ध इतर खटले प्रलंबित असले तरी त्या गुह्यांचे स्वरूप वेगळे आहे. त्यामुळे मोक्का कायद्यांतर्गत तरतुदी लागू होऊ शकत नाही, असा
युक्तिवाद अॅड. निंबाळकर यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायमूर्तींनी भिसेला जामीन मंजूर केला.दरम्यान, या प्रकरणात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सहआरोपी तात्या कारंडेला उच्च न्यायालयाने जामीन दिला होता अशी माहिती कळतेय.

No comments:

Post a Comment