बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारीला उच्चांकी दर..
बारामती:- सोमवार दि. १० जुलै २०२३ रोजी बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात ज्वारीला प्रति क्विंटल रू. ६०५१/- असा उच्चांकी दर मिळाला. माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हनुमनंत तरटे यांचे ज्वारीला उंच्चाकी दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने जादा दर मिळत आहे. तसेच चांगल्या दर्जेच्या गव्हाला रू. ३०००/- प्रति क्विंटल दर मिळाला. तर लिलावात चांगल्या मकेला प्रति क्विंटल रू. २१७१/- दर निघाला. तसेच बाजरी, हरभरा, तुर उडीद, खपल या शेतमालाची आवक होऊन बाजरीला प्रति क्विंटल रू. २५०१/- आणि हरभरा रू. ४७८१/-, तुरीला रू. ९०११/- उडीद – ८१४०/- आणि खपल रू. २५२०/- असा प्रति क्विंटल दर निघाला. खरेदीदार म्हणुन आवारातील बाळासो फराटे, महावीर वडुजकर, मिलिंद सालपे, शशिकांत सालपे, जगदिश गुगळे, दिपक मचाले, अशोक भळगट, सतिश गावडे, यांनी सहभाग घेतला. बाजार आवारात शेतमालास चांगला दर मिळत असल्याने शेतक-यांनी आपला शेतमाल स्वच्छ व ग्रेडींग करून आणल्यास आणखी चांगला दर मिळेल अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी दिली.
ज्वारीची आवक माण, दहिवडी या तालुक्यातुन येत आहे. तसेच बारामतीसह इंदापुर, दौंड, फलटण या तालुक्यातुन शेतमालाची आवक होत आहे. मुख्य बाजार आवारात ग्रेडींग मशिन असल्याने शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा. यासाठी आणखी एक नवीन मशिन बसविणेचा समितीचा मानस आहे. जेणे करून शेतक-यांचा शेतमाल कमी वेळेत जादा स्वच्छ होईल. त्यामुळे त्याचा आर्थिक फायदा शेतक-यांना होईल. तसेच समितीने आवारात शेतमाल आल्यानंतर प्रथम वजन नंतर लिलाव अशी सुविधा असल्याने शेतक-यांना लगेच पेमेंट मिळत आहे. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल बारामती बाजार आवारातच विक्रीस आणावा असे मत सचिव अरविंद जगताप व्यक्त केले.
No comments:
Post a Comment